MAHENDRA SONEWANE

Others


3  

MAHENDRA SONEWANE

Others


निसर्गाच्या कुशीत

निसर्गाच्या कुशीत

1 min 172 1 min 172

निसर्गाच्या कुशीमध्ये, 

मिळे सर्वाना जीवन। 

खाणे पिणे ही मिळती, 

सुखी राही सर्व जण।। 


धरती आहे सर्वाची माय, 

प्रेम कुठे कमी नाही। 

आकाशातील चंद्र पाहून, 

शितलता देई नवलाई॥ 


ऊन वारा नि पाऊस, 

देती जगण्याची आस। 

रात्री निसर्गाच्या कुशीत, 

निघे काजव्यांची रास॥ 


डोंगराच्या कुशित उगवतो, 

मनमोहक तांबुस गोळा। 

दर्शन सूर्याचे प्रसन्न, 

जमतो पाखरांचा सोहळा॥ 


निसर्गाच्या कुशीमध्ये, 

वाहतो पानी पांढरा शुभ्र। 

देतो हाच जीवन सारा, 

मोकळा आकाश निरभ्र॥ 


Rate this content
Log in