निसर्गाची शिकवण
निसर्गाची शिकवण
1 min
609
माणसाने निसर्गाकडून एक शिकावं
सतत दुसर्यांना देण्याचं
तुम्ही त्याच्याशी कसेही वागा
पण तो कधीच द्यायचं सोडत नाही
तुम्ही झाडांना पाणी घालत नाही
म्हणून ते तुमच्यावर रागावतात का?
ऊन असो वा पाऊस असो
ते तुम्हाला आडोसा देतातच ना!
केर, कचरा, घाण टाकता नदीत
तरीही ती वाहायची थांबत नाही
झाडे पक्षी वृक्षवल्ली ,आणिक माणूस
यांची तहान भागवायचे काम सोडत नाही
मनुष्याने ही असंच जगावं
भरभरून देत जावं ,सुख असो वा आनंद
कारण आपल्यामुळे इतरांच्या चेऱ्यावरचे हसू
तेच रूप म्हणजे साक्षात तो भगवंत...
