STORYMIRROR

Smita Murali

Others

3  

Smita Murali

Others

निसर्गाची साद

निसर्गाची साद

1 min
416

ऐक मानवा मानवा

निसर्ग घालतो साद

किती पळशील थांब

थोडा होवू दे संवाद


तू रे लेकरु सृष्टीचे

बुद्धीवंत तू सजीव

तू जाणून असशी

झाडातही रे जीव


करुनी झाडांची कत्तल

का घेतोस त्यांचा जीव

दिली फळे फूले छाया

त्यांची कर ना रे कीव


स्वार्थासाठी करतोस

झाडी जंगलाची हानी

खडसावून बजावतो 

आता बंद कर मनमानी


सृष्टीचक्रावर तू जर

करशील काही आघात

मग माझा वाढेल कोप

तूच करशील तुझा घात


महापूर दुष्काळचक्रातून

आता स्वतःला तू सावर

वेळीच हो मानवा जागा

घाल हव्यासाला आवर!!


Rate this content
Log in