निसर्गाचे रक्षण
निसर्गाचे रक्षण
पहाटेची गुलाबी थंडी रेशमी
अंगावर रोमांचित शहारे आणती
चंद्र - तारकांचे आपसूक लपणे
आगमन होते जेव्हा सूर्य देवाचे
दवबिंदूंवर पसरताच सारी किरणे
वाटते जणू सजले मोती टपोरे
गुलमोहराचा सडा जिथे तिथे
सुगंधी बहरले चोहीकडे केवडे
कोकिळा धरते मधुर तान
कोंबडयाने आपली उंचावली मान
पक्षांचा चाले किलबिलाट छान
प्राण्यांचा ऐकू येई आर्त नाद
मधमाश्या सुमनांतील रस शोषती
फुलपाखरेही इथे मजेत बागडती
संथ वाहणारा निरागस झरा
अवखळतो हा खट्याळ धबधबा
बाराही महिने ऋतुंचा खेळ चालतो
यात प्रत्येक जीवाचा हृदय गुंततो
दिले भरभरून या धरेला निसर्गाने
रक्षुया चला जल , वायू अन् वने
