निसर्गाचे कैदी
निसर्गाचे कैदी
निसर्गाच्या प्रत्येक उत्पतीत
एकच गोष्ट वारंवार घडली
अविचारी आपलेच श्वास
बंदिस्त या चार भिंतीत झाली
वेळोवेळी नाशकरन्या सृष्टीचा
मानवाने पाय बाहेर ठेवला
निसर्गाच्या कोळसा करण्या
निर्भिडपणे तो सरसावला
श्वास रोखला या वसुधेचा
कत्तल केली अमानुषपणे
वाढवीत आपली स्वप्रस्था
काबीज करत त्यांची रानवने
हाहाकार माजवलास तूच
वादळ तरी हे कोण रोखणार
तिच्या सौंदर्याला अजूनही रे
कितिदातरी असे जाळणार
आज ....
क्षणात बदलली चहुवर दिशा
आकाश काळे दूर निघून गेले
विषाणुच तो का असेना पण,
त्यानेच मानवा तुज कैद केले...
त्यानेच मानवा तुज कैद केले...
