निसर्गाचे बोल
निसर्गाचे बोल
निसर्ग बोलतो आहे बघा
पाण्या विना माणसाची तळमळ बघा
तूच आणलीस मानसा अशीही वेळ
वृक्षतोड करून निसर्गाचा मांडला खेळ
जो अक्सिजन मी मोफत देतो
ते तू माणसा विकत घेतो
पैशाने तुम्ही विकत आणसाल दाणि
एक दिवस विकत सुद्धा मिळणार नाही पाणी
जेव्हा होते जमिनीवर पाणीच पाणी
तेव्हा नाही केली त्याची किंमत कोणी
पाण्याविना जनावरे ही तरसत बसली
माणसाच्या कर्माची फळे त्यांनी भोगली
वृक्षतोड करून केलीस इमारत उभी
पाण्यासाठी तुझी माय नदीवर उभी
प्रेमळ अशा जमिनीवर अन्याय केला
म्हणून असा दिवस तुझ्या नशिबी आला
माणसाचा अन्याय सहन होत नाही
निसर्गाच्या हाकेला साथ दिली नाही
निसर्ग तरी तुला का साथ देईन
सर्वच पाडतात शब्दाचा पाऊस
झाडे लावू झाडे लावू
म्हणतात फक्त वृक्ष लागवड करणार
त्यांना वाढविण्याचा जीम्मा कोण घेणार्
निसर्ग कसा कोपतो बघा
पाण्याविना माणसाला देतोय सजा
केला त्याने तुमचा आनंद वजा
आयुष्याच्या गणितातले दिवस मोजा
केला नाही यावर वेळीच उपाय
माणसा तू मॄत्युस सामोरा जा
निसर्गालाही द्यावे थोडे रंग
त्याच्या भावनांत व्हावे थोडे दंग
आपण थोडा दिले तर निसर्ग भरपूर देतो
याचा अनुभव प्रत्येक जण घेतो
वाटत असेल सर्वजण व्हावेत सुखी
निसर्गालाही तुम्ही करू नका दुखी
निसर्ग त्याचे बोल बोलतो आहे
माणसाच्या साथीची वाट पाहतो आहे
निसर्गाची किंमत माणसाला कळणार
तेव्हा मात्र माणूस पश्चाताप करणार
