निसर्ग
निसर्ग
1 min
292
रानामध्ये पाऊस पडूनी जाता
भकास वाळलेल्या काट्याकुट्यातून हिरवे कवळे पान
उमटते हिरवे-हिरवे चोहीकडे
माळरान गालिचा पहाटेच्या पहरी
पानावरती पारा दवबिंदू चकाकी
डोंगर झाडांच्या जाळीतुनी
सूर्याची किरणे येती किरणे पारा
दवबिंदू सोन्याचं पिवळेपण
चांदीचं चमचमणारं हे सौंदर्य
डोळ्याने पाहताना डोळेपण
चमकवणारे डोळे ही मोहुनी जाती
हा असा निसर्गाचा खेळा
