निसर्ग
निसर्ग
1 min
147
निसर्ग माझा सखा
निसर्ग माझा गुरू
उपकार त्यांचे जाणू
सदैव त्यांना स्मरू.....
वृक्षलागवड ती करू
जमिनीची धूप थांबवू
खत पाणी तयांना घालून
नित्य काळजीत्यांची घेवू....
सूर्य देतो प्रकाश अन उष्णता
आभारही मानू पावसाचे
मिळते जगाला पाणी त्यामुळे
ऋणी राहू आपण निसर्गाचे.....
उंच डोंगर ,खोल खोल दरी
सौंदर्य खुलते घाटमाथ्यावरी
हिरवागार शालू नेसली वसुंधरा
मानवी कृत्यांचा बोझ निसर्गावरी.....
पानापानातून डोकावतात
सूर्यकिरण छान चमकतात
आळवाच्या पानावर हो
दवबिंदू मोतीसमान भासतात.....
निसर्ग शिकवतो जगणे
देतो मानवाला जीवनी आधार
सदैव ऋणात राहूया त्याच्या
मानूया या सृष्टीचे आभार......
