STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

निसर्ग

निसर्ग

1 min
641

तेज तुझे पसरले

रविराजा या भूवरी

धरती सोन्याने न्हाली

सडा दिसे चौफेरी


झाडांच्या फांदीतूनी

डोकावसी तू हळूवार

तांबूस प्रकाश तुझा तो

शोभून दिसे अवनीवर


किरणे कोवळी तुझी

झेलते पृथ्वी अंगावरी

सौंदर्याचे चित्र अलौकिक

चित्रकार तो सुरेख चितारी


Rate this content
Log in