निसर्ग
निसर्ग

1 min

218
वृक्षारोपण करूनी
हरीत सृष्टी वाढवू या
निसर्गाचे रक्षण करू या
प्रदूषणास आळा घालू या...
पाहता हरीत निसर्ग
लता, वेली, पशू, पक्षी
नभ उतरू आलंय
मन पाखरू झालंय.....
हरीत हरीत देखणे
गालिचे पसरे चौफेर
निसर्गात फुललंय
नभ उतरू आलंय.....
गगनी मेघ विहरती
रिमझिम धारा बरसती
यात इंद्रधनू फुललंय
नभ उतरू आलंय.....
वृक्षांवरी, वेलींवरती
विहंग किलबिल करती
फांदीवरती घरटं बांधलंय
नभ उतरू आलंय.....
आदित्य पानाआडून
चमचम छान चमकतोय
गगन किरणांनी फुललंय
मन पाखरू झालंय...