निसर्ग
निसर्ग
1 min
188
शांत निसर्ग
भावभावनांचा हो
मनी विसर्ग...
आसमंतीचा
विहंगम विहार
शांत विचार.....
या जलधारा
नृत्य करी डोंगरी
उंच अंबरी.....
उदक शांत
उंचावरून वाहे
डोंगर पाहे.....
सरिता शांत
निर्मळ मनी भाव
घे रे मानव.....
वसुंधरेचा
नववधू शृंगार
सृष्टी आधार.....
निसर्ग लेणे
सांभाळू धरावर
घ्या मनावर.....
