निसर्ग संरक्षण
निसर्ग संरक्षण
कोरोनाच्या आगमनाने सारे जग सुनसान झाले
मोठी- मोठी डिंगी हाकनारे पंडित, तांत्रिक, ज्योतिषी,
कुठे दडी मारुन,कोन्या कोप-यात लुप्त झाले ?
कोरोनाचा कोप दुर करणारी देवालय, दर्गा बंद झाले.
सरकारला क्षणा-क्षणाला विरोध करणारे मुल्ला, पुजारी,
मजीद,देवालय स्वतः तालाबंदी करुन निकामी झाले.
नाही कोन्या कर्मकाणडी भटाचे विरोधी सुर कानी पडले,
धार्मीक कर्मकाणड सांगणा-याचे पितळ उघडे पडले,
तरी यातुन किती बहुजन नेमके काय शिकले ?
कोरोनाचा नैसर्गीक प्रकोप काय धडा शिकवतो,
धार्मीक कर्मकाणड करणा-याचे खरे रुप दाखवतो,
आता तरी बहुजनाने आपले दोळे उघडावे.
कुठे दिसत नव्हता दैवी शक्तिचा चमत्कार,
जिकडे- तिकडे कोरोना ने माचवला हाहाकार.
सारे चमत्कारी झाले स्वतः भू तडीपार,
फ्क्त,डॉकटर, शीपाई, नर्स व स्वयमसेवी सेवेत हाजीर,
कोरोना संक्रमितांना यांचाच होता फक्त आधार.
सुविख्यात जोतिष्याने कोरोनाचे भाकित कां केले नाही ?
कारण जोतिष्य शास्त्राचा वैज्ञानिक पाया नाही,
म्हनुच जोतिष्य शास्त्र भाकित करु शकले नाही.
आपल्या जीवनाचे सत्य फक्त आपल्या कर्मात असते,
बाकी सर्व निसर्गाच्या नियमानुसार असते.
विज्ञान व प्रोद्योगीकीच्या विकासाने,
स्वार्थी मानवाने बिघडवले निसर्गाचे चक्र.
मानवाला सचेत करावे म्हनुण,
निसर्गाने केली आपली कृपादृष्टी वक्र.
जर थांबवयचे असेल माहामारीचे हे चक्र,,
निसर्ग अस्तित्व जोपासन्याची मानवानी करावी फिक्र.
अंगीकारावी लगेल एकदम साधी सरळ जीवनशैली,
पुनर्जीवित करावी लागेल सनातन परंपरा पध्द्ती.
सनातन परंपरापध्द्ती वाढवेल रोगप्रतिकारक शक्ती,
महामारीला मात देईल हीच फक्त रोगप्रतिकारक शक्ती.
