STORYMIRROR

Arun Gode

Others

3  

Arun Gode

Others

निसर्ग संरक्षण

निसर्ग संरक्षण

1 min
221

कोरोनाच्या आगमनाने सारे जग सुनसान झाले

मोठी- मोठी डिंगी हाकणारे पंडित, तांत्रिक, ज्योतिषी,

कुठे दडी मारुन, कोन्या पऱ्यात लुप्त झाले ?

कोरोनाचा कोप दूर करणारी देवालय, दर्गा बंद झाले.

सरकारला क्षणा-क्षणाला विरोध करणारे मुल्ला, पुजारी,

मशीद, देवालय स्वतः तालाबंदी करुन निकामी झाले.

नाही कोण्या कर्मकाणडी भटाचे विरोधी सुर कानी पडले,

धार्मीक कर्मकाणड सांगणा-याचे पितळ उघडे पडले.

तरी यातुन किती बहुजन नेमके काय शिकले ?

कोरोनाचा नैसर्गीक प्रकोप काय धडा शिकवतो.

धार्मीक कर्मकाणड करणा-याचे खरे रुप दाखवतो,

आता तरी बहुजनाने आपले डोळे उघडावे.

कुठे दिसत नव्हता दैवी शक्तिचा चमत्कार,

जिकडे- तिकडे कोरोना ने माचवला हाहाकार.

सारे चमत्कारी झाले स्वतः भू तडीपार,

फक्त, डॉक्टर, शिपाई, नर्स व स्वयंसेवी सेवेत हाजीर,

कोरोना संक्रमितांना यांचाच होता फक्त आधार.

सुविख्यात जोतिष्याने कोरोनाचे भाकित कां केले नाही ?

कारण जोतिष्य शास्त्राचा वैज्ञानिक पाया नाही,

म्हनुच जोतिष्य शास्त्र भाकित करु शकले नाही.

आपल्या जीवनाचे सत्य फक्त आपल्या कर्मात असते,

बाकी सर्व निसर्गाच्या नियमानुसार असते.

विज्ञान व प्रोद्योगीकीच्या विकासाने,

स्वार्थी मानवाने बिघडवले निसर्गाचे चक्र.

मानवाला सचेत करावे म्हणून,

निसर्गाने केली आपली कृपादृष्टी वक्र.

जर थांबवयचे असेल माहामारीचे हे चक्र,

निसर्ग अस्तित्व जोपासण्याची मानवानी करावी फिक्र.

अंगीकारावी लगेल एकदम साधी सरळ जीवन शैली,

पुनर्जीवित करावी लागेल सनातन परंमपरा पध्द्ती.

सनातन परंमपरा पध्द्ती वाढवेल रोगप्रतिकारक शक्ती,

महामारीला मात देईल हीच फक्त रोगप्रतिकारक शक्ती.


Rate this content
Log in