STORYMIRROR

Smita Murali

Others

3  

Smita Murali

Others

निसर्ग सखा

निसर्ग सखा

1 min
273

निसर्ग माझा सखा सोबती

धरतीवरचा स्वर्ग हा जसा

करु जतन या निसर्गाचे

चला मिळूनी घेवूया वसा


काळी माती बहरली राने

फुलाफळांचे किती नमुने

डोंगरवाटा नि सागरलाटा

खुणाविती त्या पाऊलवाटा


नानाविध या रुपामधूनी

निसर्ग बहरतो पहा कसा

करु जतन या निसर्गाचे

चला मिळूनी घेवूया वसा


नयनरम्य या देखाव्यांचे

नेत्रसुख ते किती लुटावे

निसर्गाची किमया न्यारी

लाकडालाही पर्ण फुटावे


ऋतूचक्राच्या तालावरती

निसर्ग चालतो पहा कसा

करु जतन या निसर्गाचे

चला मिळूनी घेवूया वसा


नको कोप नि नको प्रकोप

निसर्ग संतुलन आजच राखू

झाडे लावूया पाणी वाचवू

गोड फळे साऱ्यांनी चाखू


प्रदुषणाला घालून आळा

स्वच्छतेचा उमटवू ठसा

करा जतन रे निसर्गाचे

चला मिळूनी घेवूया वसा


Rate this content
Log in