निसर्ग माझा सोबती
निसर्ग माझा सोबती
तू माझा सोबती
मन रमते तुझ्या संगती।
मन निस्वार्थी तुझे
भरभरून फुल, फळे देतो।
शिकवण तुझी तू मानवास लाजवतो।
स्वार्थी मानव तोडण्यास तुला असतो तयार।
तू देखील जिद्दी ऊन, वारे, पाऊस
तरी मानत नाही हार।
सगळे सोसत राहतो ठाम उभा।
हातात हात तुझा विश्वासाने गुंफला की जगण्याची येते मजा।
तू देतोस इतके आम्हाला तुझ्या दानशूरतेची कल्पना येते।
इवलेसे हात माझे तू दिलेले घेण्यास कमी पडते।
म्हणून वाटते सान्निध्यात तुझ्या
राहून झाले मन माझे निर्मळ।
हे निसर्गा, सख्या, सवंगडी, सोबती तू असावा नेहमी माझ्याजवळ
असावा नेहमी माझ्याजवळ।
