निसर्ग चक्र
निसर्ग चक्र
1 min
40
तरुनाईने नटले डोंगर
वार्धक्याकडे झुकणार..
हिरवे हिरवे गार डोंगर
तांबूस पिवळे होणार..
हिरवी हिरवी गार पाने
पिवळी पिवळी होणार..
आयुष्य संपले म्हणून
झाड त्यांना सोडून देणार..
आधाराने वाढल्या वेली
हिरव्या कशा राहणार
संगत सोबतीत झाडा बरोबर
त्यांना ही पाने सोडावी लागणार
खळखळणारे झरे
आवाज कमी होणार..
तहानलेले पशुपक्षी
त्याच्या पासून दूर जाणार..
वसंत ॠतूच्या आगमनात
झाडे हिरवी गार होणार..
डोंगर आणि झरे मात्र
पावसाची वाट पाहणार..
