STORYMIRROR

Shravani Balasaheb Sul

Others

3  

Shravani Balasaheb Sul

Others

निशेची निशाणी...

निशेची निशाणी...

1 min
258

रात्र शांततेचा ध्वनी

काव्यप्रकाश हदयभवनी

नभात चंद्रचांदणी

स्फुरती हजार गाणी.....


रातकिड्यांची किरकिर कानी

खोल वेदनांची ती वाणी

समुद्र उतरे नयनी

स्मृतीलाटा उसळती मनी.....


दवबिंदू शोधे निवारा पर्णी

सुकीच राही तहानली धरणी

पाहूनी निसर्गाची ही करणी

मन नकळत जाई त्याच्या शरणी.....


शशीराजाची राणी रजनी

संध्या ती जी लवते पापणी

नभात डोकवता चंद्र पाहुनी

तिस छेडती चांदण्या साऱ्या जणी.....


नभी रांगोळी चंद्रताऱ्यांच्या प्रकाशानी

अशी ही सुरेख निशेची निशाणी

मनास मोहिले चंद्राच्या आकांक्षांनी

निशा-शशी मिलनास कवेत घेतले आकाशानी.....!


Rate this content
Log in