निरोप
निरोप
1 min
356
एवढ्यात निरोप घेईन
असं कधी वाटलं न्हवतं....
निरोप समारंभाच भाषण अजून
तसं काही छापलं नव्हत..
एखादी काळजातली रेघ.. त्यावर,
माळायची राहिलीय ..
दोन थेंब अश्रुची पानावर,
गाळायची राहिलीत..
अडखळणारी शब्दरचना,
दुरुस्तीला टाकलीय ..
भावनांची पेरणी अजून,
करायचीच राहिलीय ..
बघू!.. सगळं कसं ,
जुळून येईल ..
तेव्हाच निरोपाचं जरा,
सोपं जाईल ...!!!
