STORYMIRROR

Leena Yeola Deshmukh

Others

3  

Leena Yeola Deshmukh

Others

निरोप

निरोप

1 min
141

सूर्य उगवतो

सूर्य मावळतो

बघता बघता

दिवस सरतो !!१!!


दिवस येतात

दिवस जातात 

सुख नी दुःखाच्या

सरी बरसतात !!२!!


हास्य अश्रूंचा

प्रवाह वाहतो

जीवन प्रवास 

चालूच राहतो !!३!!


वर्षांमागून वर्ष

जात राहतात

हसत खेळत

दिस सरतात !!४!!


कोणासाठी

पर्वणी सुखाची

कोणासाठी

दरी दुःखाची !!५!!


संमिश्र भावना

यंदाचे हे वर्ष 

निरोप देतांना

मनी ठेवू हर्ष !!६!!



Rate this content
Log in