STORYMIRROR

Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

निरोप शाळेला

निरोप शाळेला

1 min
67

शाळा म्हणजे विश्वास आहे

शाळा म्हणजे श्वास आहे

शाळा म्हणजे कौतुकाची

निरंतर थाप अन शिस्त आहे....


शाळा म्हणजे मधूर गीत आहे

शाळा म्हणजे सप्त सूर आहे

बालपणातील सुखद काळ आहे

मोठेपणातील सप्तरंगी कमान आहे,...


शाळा म्हणजे कटू-गोड आठवणी

शाळा म्हणजे अनुभव साठा आहे

शाळा म्हणजे दिलखुलास हसणे

अन मैदानावरील चढाओढ आहे...


शाळा म्हणजे आपुलकीचा पाश आहे

शाळा म्हणजे पवित्र ज्ञानमंदीर आहे

शाळा म्हणजे सरस्वतीचा वास आहे

शाळा म्हणजे मित्र परिवाराचा ठेवा आहे.....


याच शाळेत बाईंच्या रूपात आई आहे

वडिलांच्या रूपात शिस्तमय गुरुजी आहे

शाळा ही बालवाडी ते दहावीचा हर्ष आहे

दहावीनंतर शुभेच्छामय पाठवणही आहे.....


Rate this content
Log in