STORYMIRROR

yuvaraj jagtap

Others

4.2  

yuvaraj jagtap

Others

निरोप देताना-- (कविता)

निरोप देताना-- (कविता)

1 min
26.9K


पोरी थाटला तुझा

विवाह सोहळा

आप्तजन सारे झाले

अक्षद्यास गोळा


मायाही बापाची 

आहे बघ वेडी

मंगळसूत्राची तुझ्या

गळा पडली बेडी


फुलास जपावे तसा

जपला पोटचा गोळा

परी आज मज नयनी

पाणी झाले गोळा


माझ्या बापाच्या काळजात

दाटली भयान हुरहूर

मज पापण्यांनी 

अडवला पाण्याचा पूर


काळजाच्या तुकड्यास

देताना दुसऱ्या हाती

मज नयनही आज

दुःखाश्रुंचे गाणे गाती


होतीस आजवरी 

माझी तू मुलगी

करितो अश्रू पुरांनी

परक्या घरी रवानगी


बाप म्हणुनी करितो

ईश्वरास विनवणी

परक्या घरीही सुखात

राहू दे माझी राणी


Rate this content
Log in