निर्धार
निर्धार
प्रयत्नशीलता हे जगण्याचे
तत्व मनात घ्यावे जाणून
कार्यरत रहाणे सोडू नये
आहे देहात जोवरी प्राण
उंच उंच घाट हा
चढणे फार कठीण
अशक्य ते शक्य होई
कठोर करून प्रयत्न
खचू नाही द्यायचा कधी
हृदयाचा निर्धार
मग भीती मुळीच नसे
जित नक्की होणार
मनासी ठाम निश्चय कर
पाऊल पुढचे पुढेच ठेव
मग शिखरावर पोचून तू
स्वतःची हिंमत जगास दाखव
लोखंडास देतात घाव
जेव्हा असतो तो गरम
योग्य वेळीच केले पाहिजे
योग्य ते काम
पिंपळाच्या रोपासारखं
खडकावर उगाव
निर्भीडपणे निर्धाराच्या
वाटेवर चालावं
वादळे येतात अनेक
मातीत घट्ट पाय
रोवून उभा रहावं
यश तुझी वाट पाहतोय
ढळू देऊ नको निर्धार
दगडावर पाय ठेवून
पाणी काढण्याइतका
विश्वास ठेव स्वतावर.
