निर्धार
निर्धार
1 min
167
क्षणालाही घाबरत नाही
जरी उभ केल मृत्युच्या दारात
यमालाही परत पाठविण
एवढी हिमंत ठेवतो उरात
हिमंंत आहे सत्याची
ज्याचे संंस्कार झाले घरात
मोडेेल पण वाकणार नाही
वाढलोय अशांच्या उदरात
होवू द्या वेदना कितीही
जोपर्यंत जीव असेल जीवात
तत्वांशी ती तडजोड नाही
उभ्या जन्मभरात
विध्वंसक असो वा विरोधक
असू दे कितीही जोरात
अगतिकताा वा लाचारी
नसेल कधीही स्वरात
होवू द्या आघात कितीही
वा निघुद्या मृत्युची वरात
ईश्वराशिवाय कोणालाही
भिक मागणार नाही पदरात
