निरभ्र आकाश...
निरभ्र आकाश...
निरभ्र आकाश मनाचा अवकाश ,
पेटवल्या त्यात महत्वाकांक्षी ज्वाळा,
जळून राख झाल्या मनीच्या तारका,
निर्मळतेला गेला तडा सारे दुःखात होरपळा...
बेचिराख स्वप्नांच्या चिता,
डोंब उसळलेला भावनेचा ,
निपचित पडलेला घाट आठवांचा ,
होणारी धुमसन उठणारा धूर मनी तारकांचा ...
धाव धाव आयुष्याची ,
नाही आराम नाही श्वास सुखाचा ,
कोंडमारा सारखा दाब वाढतोय समाजाचा,
शेवट सुंदर नारंगी लाटा वाहवत नेतात ,
आणि तो चिरनिद्रेत विलीन झालेला अनंताचा...
संपता संपता नवांकूर फुटतो ,
निर्धारालाच माझ्या आग करतो,
लाथाळतो त्या फुलांनी सजलेल्या सुखाच्या शेजेला ,
बाकी सगळ्यांची राख आसमंती उडवतो ,
सज्ज पुन्हा एकदा नव्याने आव्हानाला ...
