STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

निराशा

निराशा

1 min
329

तुमच्याजवळ जेव्हा काहीच नसते

तेव्हा इतरांंचाही नाईलाजच असतो

कारण, तुमच्यासाठी

त्यांच्या जवळही काहीच नसते

जो तो फक्त सहानुभूतीचा दर्शवतो

आणि मग त्यातूनच 'ती'चा जन्म होतो

जन्म तर होतो तिचा 

मग तिला घर कोणते? 

खूप विचार करून 

तुमच्या मनात घर करते

आणि सारे विश्व तुम्हाला 

तिच्याच रुपात दिसू लागते

जिथे तुम्ही तिथे 'ती'

पडछायेसम येते संगती

पूर्वेला 'ती', पश्चिमेस 'ती'

उत्तर दक्षिण इकडेही 'ती'

वरती खाली सर्वत्र 'ती'

तिने व्यापिल्या दाही दिशा

स्वतंत्र विचारांसाठी मार्ग न उरला

अशी ही जिवंत जाळणारी,

'निराशा'


Rate this content
Log in