STORYMIRROR

पद्मवैखरी ठाकरे

Others

2  

पद्मवैखरी ठाकरे

Others

निरागसतेची भुक

निरागसतेची भुक

1 min
195

कशी ओंजळी रिकामी

तुझ्या पोटाची अजूनही

भीक भागवते भूक जरी

पण मन उपाशी तरीही


तुझ्या कुशीतल्या झोपेची

सर बिछान्याचीही नाही

डोळे दमले किती तरी तुझे

श्वास जागा उशाशीच राहि


माय गेली रडतच जेव्हा

तुझ्या हातात मी होतो

तिच्या शब्दाची माया तेव्हा

तुझ्या आसवाने पीत होतो


लढतोय जगणे माझ्यासाठी

तुझा घास कोरडाच राही

किती पोसशील रे मलाच

तू तर काही जगलाच नाही


प्रश्नांची उत्तरे ना सोडवे

तुला, मला अन त्यालाही

जगणे हे रोजचेच म्हणून

मला आता प्रश्नच पडत नाही


एकदातरी भेटावयाचे आहे

जाऊन त्या विधात्यालाही

जीवनाचे लक्तरे सारी आता

पुन्हा नव्याने जगवत नाही


कितीदा पाण्यातली पोळी

त्यातच मग विरूनच राही

दुधातच का संपलो नाही

हि एकच खंत मनी राही


खळगी बुजवता आयुष्याची

पोटात ओला हुंदका येई

अखेरच्या आता एकच 

शांत झोपेची वाट मग पाही


Rate this content
Log in