निरागसता
निरागसता
1 min
479
चेहेऱ्यावरती निरागसता,
त्या फुलापरी चढली,
टपोरी तुझ्या डोळ्यातली,
स्वप्ने हळूच चमकली,
पाहताच वाटते,
जपून ठेवावे तुला,
असंच फुलत रहा तू,
नाजुकश्या फुला...