निरागस
निरागस
गती मंदावलेली फार, त्यात आईच्या हातचा पडतोय मार.
घर आणि आई म्हणजेच विश्व, बाहेरच माहीत नव्हते आरपार.
आजचा दिवस उद्या यावा, म्हणजे रडायच्या वेळेच भागेल.
चड्डीतल्या पायांना दप्तर सांभाळत, पाणी डोळ्यात थोड उशिरा साचेल.
आईलाही दुरावा सहन व्हायचा नाही, थांबायची ती बाहेर.
खूप दिवस ती सोडायला यायची, वाटायच हेच तीच माहेर.
नंतर मित्र मिळाले सवय झाली, गोडवा लागला शाळेचा.
एकटाच उठून आता तयार होतो, तोवर स्वयंपाक व्हायचा आईचा.
आता सुट्टीच्या दिवशी करमेना, खेळायला कोणीच नसते.
भरल्या घरात सगळेच कामात, पायांचे रान मोकळे वाटते.
वाट बघायचो वर्गाची, आता घंटाही आवडू लागलीय.
निरागस डोळ्यात जी आसवं असायची, त्यांची जागा कुतुहलाने घेतलीय.
