STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

4  

Prashant Tribhuwan

Others

निरागस मैत्री

निरागस मैत्री

1 min
364

बंधन ना ह्या बंधनाला

जात पात न धर्म भाषा

मित्र जिवलग असता

नसे जीवनात निराशा


आनंदाचे कारण तोच,

संकट येता भाऊ होतो

देतो साथ सुखदुःखात

पाठीराखा बनून राहतो


चुकलो की कान पकडे

जीवनपथ तोच दावतो

थकता - हरता तोच तर

जोमाने कामास लावतो


मैत्रीतले हे प्रेम निरागस

आहे श्रेष्ठ साऱ्या जगतात

पद ,पैसा सर्व नश्वर वादी

हे न सुटणारा साथ मागतात


Rate this content
Log in