निलकंठ
निलकंठ
1 min
136
शिवशंकर जटाधारी
जटेतून गंगा वाहते
गळ्यात नागाचा फणा
चंद्रकोर डोई शोभते
भस्म फासूनी अंगाला
त्रिशूल शंभूच्या हाती
डमरुच्या तालावरती
नाचे पार्वतीचा पती
हर हर महादेवा
देवांच्या तुम्ही देवा
चरणी टेकूनी माथा
भक्तजन करती सेवा
सृष्टीची केलीस निर्मिती
भक्तांचे चिंतलेस हित
मानवा कधी कळावी
तुझी सेवाधर्माची रीत
स्वार्थाने बरबटलेले
मानवाचे पाहून वर्तन
सांबसदाशिव करतो
रौद्ररूपी तांडव नर्तन
लोकहितासाठी निलकंठा
विषालाही केलेस प्राशन
अत्याचारी मानवजातीला
काय करावे सांगा शासन
सृष्टीच्या उद्धारासाठी
धावतो शिवशंकर भोळा
अधर्म माजता मानवाचा
शंभू उघडेल तिसरा डोळा!!!
