STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

निखळ मैत्री

निखळ मैत्री

1 min
453

बालवाडीत पाऊल ठेवले

बाई अन मित्र समजत नव्हते

पण मित्रात राहताना मात्र

आनंद उपभोगत होते....


प्रायमरी शाळेत आता आले 

सवंगड्यांशी गट्टी जमली 

निखळ मैत्री ती वादसंवादाची

त्याच मैत्रीत सारेजण रमली....


आले मग माध्यमीक शाळेत

मित्रांचे महत्त्व समजायला लागले

शै.साहित्याची ,वह्यांची देवाण घेवाण

सुरू झाली हे पण मनाला पटले....


झाले आता काॅलेजचे दिवस सुरू

गणगोतापेक्षा मैत्रीचे नाते निभावले

हे नाते किती निखळ ,समजूतदार

हे खरच आता या वेळी समजले... 


तारूण्यातील मैत्रीचे संबंध 

सुखदुःखाचे क्षण वैचण्याचे

मनातील सारे मित्रांना 

भावनेतून कथन करण्याचे.....


म्हातारपणाची निखळ मैत्री तर

जीवनातील तेच क्षण परत स्मरण्याचे

गतकालाचा आनंद चवीचवीने मित्रांसमवेत पुन्हा कट्ट्यावर गप्पा मारण्याचे...


Rate this content
Log in