नीती , प्रेरणा आणि पालक
नीती , प्रेरणा आणि पालक
प्रेरणा असतात पालक आपले..
नसते त्यांना कोणी आपले तुपले..
नीती शिकवतात आपल्या कर्तृत्वाने ते..
सदैव मार्गदर्शन करतात आपले ते ...
माता पिता असतात गुरुजन आपले...
जेव्हा आपण नसते जगही पाहिले ..
वाईट चांगल्या गोष्टींचा फरक शिकवतात ते..
जीवन कसे जगावे सांगतात ते ...
नीती कशी असावी आपुली या जगी..
योग्य दिशा दाखवतात लावतात योग्य मार्गी..
पदोपदी दाखवतात योग्य मार्ग..
सांगतात कठोर परिश्रमाला नसतो कोणता छोटा मार्ग..
नशीब वगैरे नसतं काही ..
याची सतत देतात ते ग्वाही..
मिळतो आनंद सहवासात पालकांच्या...
जीवनाचा विचारही करू शकत नाही वाचून त्यांच्या...
प्रेरणादायी असतात अनुभव त्यांचे . .
नितीमत्ता असते सार ज्याचे..
पृथ्वीवर असतात रूप ते देवाचे..
सेवा करता त्यांची पुण्य लाभते संसाराचे...
जगी या कोणी नसते कोणाचे ...
पालकांशिवाय जगणे व्यर्थ या संसाराचे..
