STORYMIRROR

Monali Kirane

Others

3  

Monali Kirane

Others

नीरव

नीरव

1 min
176

सर्वात भयाण असते,

नीरव शांतता

शब्दांच्या अमूल्य साथीची

अबोल सांगता!

प्रेमात,दुःखात,जाज्वल्य

देशाभिमानात

शब्दांनीच बहरते

भाषेची मूर्तता!

शब्दावीण विरून जातील

अव्यक्त-तरल भावना,

मनाचा थांगही

न लागता!



Rate this content
Log in