नींदूया
नींदूया
पावसाच्या धारांनी ओले चींब होऊया
शेतामधी पीकाशी मस्तीनं नींदूया ।।
ढगाचा गळगळाट आवाज
फजिती झालीया रानात
कारभारनीन दिला आवाज
मस्तीन गाऊया रानात
धूक्याच्या सायानं मग्न दोघे होऊया
सुंदर हे रानात गाण दोघे गाऊया
पावसाच्या धारांनी ओले चींब होऊया
शेतामधी पीकाशी मस्तीनं नींदूया ।।
तुझा नजरेचा तीर असा लागला
माझ्या हृदयात येऊन धडकला
रिमझिम पावसानं ताप हा चढला
ही इश्काची दोरी दोघांना चढला
तुझा रूपाला पाहून बेभान झालोया
दिल माझ ग तुझावर आलया
पावसाच्या धारांनी ओले चींब होऊया
शेतामधी पीकाशी मस्तीनं नींदूया ।।
