नॅचरल रीसोर्स
नॅचरल रीसोर्स
1 min
430
मेमरी माझी चालत नाही
छोट्या छोट्या गोष्टींवर
अवलंबुन राहतो 'गुगल'वर...
विसरत चाललो
स्वतःची बुद्धीमत्ता
वापरत राहतो 'आर्टिफिशल इंटिलिजन्स'...
'मशिन लर्निग' म्हणे छान
एका मागुन एका प्रश्नांचा होतो भडीमार
अन् शेवटी उत्तर मिळत 'ग्राहक साह्यकाशी बोला'...
मेंदुवर माझ्या चढला गंज
गोळ्या औषधे खाण्यापेक्षा
वापरू द्या मला माझा 'नॅचरल रीसोर्स'...
उपहासाने आधी म्हटले जायचे
'कांदे बटाटे' भरले काय
पण आता म्हणावे लागतं 'एआय, एम् ल' नुसत घुसल हाय!!!
