नभ
नभ
1 min
120
ग्रीष्म ऋतू ही सरला
वसुंधराही तापलेलीच
.. केव्हा गळतील हे नभ
जीवसृष्टी कोळपलेलीच
वाट पाही बळीराजा
डोळे लावून नभाकडे
नभ येऊदे झाकोळून
घाली देवाला साकडे
बेबंध ह्या रानातून
भरारुदे हा रानवारा
मेघ येऊ दे दाटुन
कोसळू दे जलधारा
पशुपक्षीही ही तहानलेत
पाणी मिळू दे प्यायला
मृग धारांची ही बरसात
. चातकाची तहान भागवायला
बळीराजा धास्तावलाय
सावकाराच्या कर्जाला
फुलू दे सारा शेतमळा
भिजुदे भेगाळल्या भुईला
