नभ उतरु आले
नभ उतरु आले
1 min
162
नभ उतरु आले रखरखत्या उन्हात त्रस्त सारे
पशु पक्षी व्याकुळतेने नभात काढू लागले
नक्षी भेगाळलेली माती सोसवेना यातना
जन मानव मिळून लागले करु प्रार्थना
आर्त हाक ऐकून ढग झाले गोळा
अंधार दाटून येता वर लागला डोळा
भागवण्या त्रुष्णा *नभ उतरु आले*
सरीवर सर येता तुडुंब नद्या नाले
आंनदी आनंद हो पसरले अवनीवर
हिरवा शालू नेसून हर्षाने डोले तालावर
