STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

3  

Ramkrishna Nagargoje

Others

नायक

नायक

1 min
214

हसावे फुलावे,जगण्याला अर्थ देऊन,उरावे,

जिवनाच्या रंगभुमीवर नायक तू व्हावे,

अश्रुनांही वाट मोकळी,सुखांना दु:ख यावे,

जीवनाला चालवावे,जीवन आपले म्हणावे.


संथ प्रवाह जिवनाचा कधी विशाल पात्र व्हावे,

धबधब्यावरच्या प्रवाहाने धबधबा बरसावे,

खळखळुन हसावे,खडकानांही भेदित जावे,

जीवन आपुले म्हणावे,गाणे गात जगावे.


शब्द गुफिंत जावे शब्द रुतुन बसावे,

प्रेम वाटीत जावे,प्रेम घेण्यास झोळीस,

पुढे करावे,

पर दु:खे नेत्रात पाणी भरावे,

जीवनाचे शिल्प घडवित जगावे,

शिल्पकार तू व्हावे जिवनाचा.


पक्षासम उंच उंच उडावे कधी,

कधी शांतस्थळी बसावे, निवांत कसे,

विचार हास्यमुद्रे करावे,

शोधावे आपण आपणासी ,

मी कोण आहे.


पडदा उघडा आहे, भुमिका,चालू आहे,

हातवारे नायकाचे पहातच राहावे,

वाणीत शब्द भरावे,नायक व्हावे,

या रंगभुमीवरचा, सावधान असावे,

नाहीतरी पडदा पडणार आहे,

निश्चित जाणून असावे, जिवनाचा.


रंगभुमी सजवावी,फुलवावी जिवनाची,

नाहीतरी रंगभुमी तसिच आहे,

नायक बदलत आहे, रंगभुमीवरचा.


Rate this content
Log in