STORYMIRROR

Suresh Kulkarni

Others

3  

Suresh Kulkarni

Others

नाविका रे !

नाविका रे !

1 min
239

नाविका रे ...

वाडा तुझा लाटांवरी

रहातोस दर्यावरी 

महासागर तुझा किनारा !


लाटांवरी वरखाली 

तू डौलानं डोलसी

महाराजा तू होडीचा


हे अंगण नभाचं

पडतंय तुला थिटं

ही भरती ओहोटी 

श्वास तुझा

अन वादळ वारं

संगे खेळायाला येतं

कप्तान तू होडीचा


किरपा भारी तुझ्यावर

वरुणदेवाची

रहा मस्तीत नेहमी गड्या

लाभो साथ तुला त्याची

कर राज्य दर्यावरी 

समिंदराच्या फेसावाणी 

तू हसत रहा


Rate this content
Log in