STORYMIRROR

Manisha Wandhare

Others

3  

Manisha Wandhare

Others

नात्यांतच गुंतत जातो...

नात्यांतच गुंतत जातो...

1 min
174

लंपडाव हा नात्याचा , नात्यांत गुंततच जातो ,

काळजाला दुःख तरी, नात्यात गुंततच जातो...

डोळ्यांना तुझ्या डोळ्यांच्या,आरपार पाहू दे,

अदृश्य मन जरी बघ,नात्यात गुंततच जातो...

सतरंज खेळायला सुरवात, तूच केलीस ना ,

वजीरच चेकमेट करतो तरी,नात्यात गुंततच जातो...

ओला हळवा वारा ,स्पर्श करीत राहतो अंगास,

आठवांचा वारा तो, नात्यात गुंततच जातो...

रेशीम गाठी कधी ,सात जन्म जोडण्यासाठी ,

तुटणाऱ्यां गाठीतही पहा,नात्यात गुंततच जातो...


Rate this content
Log in