STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

नात्यांचे रेशीम बंध

नात्यांचे रेशीम बंध

1 min
835

रेशीम धागे जमविण्याचा छंद असे मज खासा|

गुंता एकमेकांच्यात होता उकलणे गुंता रात्रंदिवसा||१||


एकही धागा तुटू नये म्हणूनी जपत असे मी फार|

तरीही तुटताना अवचित धागा मज दु:ख होई अपार||२||


निर्जीव अशा धाग्यांनीही का असे वेड मला लावावे?

का भावनाशून्य धाग्यांतही वेडे मन माझे गुंतावे?||३||


रेशीमबंध नात्यांचे नाजूक बंध कसे मी सांभाळावे?

ऋणानुबंधाच्या गाठी उकलताना अश्रू का ते ढाळावे?||४||


अहंकार, गैरसमजाच्या शृंखलांनी बंध जाती जखडून|

शृंखला तोडता नव्याने जखमाच उठती का भळाळून?||५||


हृदयाकृती आपट्याची पानेही जोडण्या ठरती व्यर्थ|

रुक्ष भासे का तरीही दसरा देऊन हाती सुवर्णरुपी ते अर्थ||६||


इंटरनेटच्या जाळ्यात नव पिढी पूर्णपणे आज गुरफटली|

फिरवून पाठ घरच्यांकडे तोंड बाहेरच्यांना दाखवत सुटली||७||


वसुधैव कुटुम्बकम् म्हणताना आप्त, परिवारच हरवून बसली|

तेलाबरोबर सांडून धुपाटणे कवटाळून बसली||८||


Rate this content
Log in