STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

4  

Ramkrishna Nagargoje

Others

नातवंडं

नातवंडं

1 min
308

नातवंडं असतात,

ती गुलाबाची फुलं,

जरा आजोबा, आजी,

दिसली नाहीत तर,

कावरी बावरी होतात


गोड फुलंच ना ती,

जरासं बोललं,

काही तर सुकतात,

ती फुलासारखीच

चेहरा सुकून बसतात


खूप प्रेम करतात ती,

किती निरागस असतात,

आजोबा आजी, म्हणजे

त्यांची आनंदाची

ठिकाणाचं असतात,

जशी फुलं वेलीवर,

असतात


गोड गोड खाऊ, 

घालते आजी,

आजोबा, नातवासाठी,

घोडाही बनतात कधीकधी.


अगदीच कसं प्रेम, 

असतं, त्याचं,

मोहरुन येतात,

फुलं जशी, विचारतात ,

आजी कुठे, गेली गं आई, ?

बाबा कुठे आहेत, गं आई,?

रागच येतो आईचा,

उत्तर देत नाही, काही, आई


आजी आजोबा,

फिरुन येतात थोडे,

मिठी मारुन आजीला,

गोड पापा देतात,

खळखळून हसतात,

आजोबासोबत जशी ती,

कोवळी फुलं फुलतात.


हे नातं वेगळं असतं,

आजीचं दुखणं पाहून,

डोळ्यात पाणीच येतं,

नातवांच्या,

आजोबाची काठीच,

होतात ते, 

जशी, वेलीवर,

फुलंच उमलतात,

अलगद कधी ,

सुगंध घेऊन येतात


Rate this content
Log in