"नातं"
"नातं"
1 min
431
नातं नवं जुळताना ,
भाव मनी हा जाहला...
मन भरून येताना ,
आसवांचा पूर आला...!!१!!
प्रेम टिकवण्यासाठी ,
शब्द हा स्पर्शून गेला...
नातं हे जपण्यासाठी ,
आयुष्याचा गुंता केला...!!२!!
काट्यांवर चालताना ,
फुलांचाही गंध आला...
वाटेवर वळताना ,
पावलांचा स्पर्श झाला...!!३!!
गंध नात्यांचा असावा ,
प्रेम , काळजी , जिव्हाळा...
मनी द्वेष न दिसावा ,
भेटू सर्व , होऊ गोळा...!!४!!
