STORYMIRROR

Vijay Sanap

Others

4  

Vijay Sanap

Others

नातं तुझं माझं

नातं तुझं माझं

1 min
41.3K


।। नातं तुझं माझं ।।

नातं तुझं माझं सख्या

नवरा नी बायकोचं

माझ्या कंपाळीच कुंकू

ते फक्त तुझ्या नावाचं।।

नातं तुझं माझ सख्या

मनी मंगळ सूत्राचं

गळ्यात बांधीन माझ्या

पती देव या पात्राचं ।।

नातं तुझं माझं सख्या

हाता मधल्या चुड्याचं

मागते रे देवा तुज

धन्या आयुष्य पुढचं।।

नातं तुझं माझं सख्या

दारी तुळस फुलली

तुझ्या माझ्या संसाराची

गाडी सुखान चालली ।।

नातं तुझं माझं सख्या

माझ्या तानुल्या बाळाचं

भवीष्य आपल त्याच्या

हाती पुढील काळाचं ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन