STORYMIRROR

Nalanda Satish

Others

3  

Nalanda Satish

Others

नातं मैत्रीचं

नातं मैत्रीचं

1 min
353

नातं मैत्रीचं 

जिवाभावाचं,क्षितिजा पलिकडलं 

आगळ वेगळं ,हास्याचा फव्वार्यासारखं 

टपरीवरच्या वाफाळलेल्या चहासारखं 

नसेल रक्ताचं पण हृदयाच्या तारा 

वाजल्या सारखं 


नातं मैत्रीचं 

अतूट विश्वासाचं 

सुखात टवाळक्या करुन खायला धावणारं

प्रतिकूल परिस्थितीत मदतीला धावून येणारं 

न घाबरता चुका मांडणारं 

मोकळ्या वातावरणात श्वास घेणारं 

पाठीवर थाप मारून उत्साहीत करणारं 


नातं मैत्रीचं 

अडीअडचणीला अधार देणारं 

खान्द्यावर डोक ठेवून मन हलकं करणारं 

जसा अंगणातील सुगंधित प्राजक्त 

जसा दरवळ्तो चाफा मुक्त 

जसे तळलेले भजे चविष्ट 



नातं मैत्रीचं 

भरभरुन प्रेम देणारं 

खळखळ वाहणार्या पाण्या सारखं 

नितळ निर्मळ स्वच्छ पारदर्शक

सोन्यासारखं चकाकणारं 

घासामधून घास देणारं 

वेदनेला पिळवटुन लावणारनातं मैत्रीचं 

क्षणभंगूर जगत क्षणभर विसावा

नयनरम्य देखावा 

विचारांचा मेळावा 

झगडा तंट्याचा निवाळा 

मोलाचा ठेवा 


Rate this content
Log in