STORYMIRROR

Medha Desai

Others

4  

Medha Desai

Others

नातं मैत्रीचं

नातं मैत्रीचं

1 min
428

नातं मैत्रीचं असतं अगदी जिवाभावाचं

निरपेक्ष वृत्तीने नेहमीच राहण्याचं १


मदतीचा हात देऊन नातं जपत रहायचं

एकमेकांच्या सहवासातून फुलवायचं २


घासातला घास देणारी घट्ट मैत्री असावी

वाकडे पाऊल पडले तर मुस्काटात मारावी ३


मैत्रीचं नातं हास्यविनोदातून फुलतं

आठवणींच्या हिंदोळ्यावर आनंदाने झुलतं ४


खरे तर अर्थच नसतो माणसाच्या जीवनाला

जर मैत्री जमली नाही आयुष्यात कुणाला ५


यशोशिखरावर असता वेळोवेळी पाठ थोपटणारी

अशी मैत्री हवी जी....जीवनाचा अर्थ सांगणारी ६


'समानशीले व्यसनेषु सख्यं' म्हणतात

तेव्हाच खरे मैत्रीचे धागे जुळतात ७


मैत्रीचं नातं बोलण्यातून आनंदाने फुलतं

आणि वेळ आलीच तर सांत्वनाचे अश्रूही पुसतं ८


मैत्रीचे रेशमी बंध घट्ट धाग्यांनी विणायचे

नि मैत्रीच्या नात्याला सहवासातून फुलवायचे ९


कठीण प्रसंगातही जगायला शिकवतं

मैत्रीचं नातं रक्ताच्या नात्यालाही लाजवतं १०


रुसवेफुगवे दूर सारून जीवन बहरतं

मैत्रीचं नातं सुखसमृद्धीतूनही सावरतं ११


असं लाघवी मैत्रीचं नातं जीवनभर जपायचं

आणि माणुसकी,आपुलकीतून टिकवायचं १२


मनामनाला आनंद देत फिरायचं

नि मैत्रीच्या नात्याने तणावमुक्त रहायचं १३


असं मैत्रीचं दृढ नातं एकोप्यानं टिकवायचं

नि मनमोकळेपणाने हसतखेळत जगायचं १४


Rate this content
Log in