नातं मैत्रीचं
नातं मैत्रीचं
मैत्रीचं सुंदर सुत्र
गुणदोषासहित स्वीकार
असा हा मुलमंत्र
नात्याला देई आकार ।१।
मैत्री म्हणजे सुंदर वटवृक्ष
सारं जग पाठ फिरवी
तरी न डगमग
जिवलग मित्र ।२।
मैत्रीच्या झाडाला
विश्वासाचं खतपाणी
जीवनात नांदतील
आनंदाच्या खाणी । ३।
मैत्री हे अतुट नातं
सुख दुःखात
मिळे साथ
करिती सर्व दुःखावर मात ।४।
जीवनात बागडणारे
मैत्री हे सुंदर फुलपाखरू
सर्वत्र फुलांवर
मनसोक्त विहरू ।५।
मैत्री एक गजबजलेले गाव
इथे कोणी नाही राव
घेती मनाचा ठाव
मैत्रीचं हेच खरं नाव ।६।
मैत्री हा एक
विश्वासाचा कप्पा
मित्रांसमवेत मारिती
मनसोक्त गप्पाटप्पा ।७।
मैत्री हे एक
डोळ्यातील अंजन
बनवी आपणा
माणूस सज्जन ।८।
सत्संसंतीची मैत्री
फुलवी जीवनी
सुंदर उद्यान
मित्र जोडता
नसावे अल्प अज्ञान ।९।
चांगल्या मैत्रीत
वाटते खात्री मदतीची
धावा करा
कधीही रात्रीअपरात्री ।१०।
