नातं मैत्रीचं
नातं मैत्रीचं
1 min
380
तिन्हीसांजेच्या या कातरवेळी
अचानक कधीतरी मन गहिवरते
आठवती मज जुने सखे-सोबती
त्यांच्या आठवणी संगे बोलविती
दिन सरले रात सरली
वर्षामागून वर्षे सरली
यौवनाच्या तालात सर्वांना विसरली
आज मात्र आठवणींची स्मरणिका उघडली
आयुष्याच्या या वळणावर उभा मी
वाटते पुन्हापुन्हा भेटावी ती
सुवर्णक्षणांनी मंतरलेली मैत्री माझी
आज फिरुनी मिळावी अनुभवायासी
