नातं मैत्रीचं ' मैत्री '
नातं मैत्रीचं ' मैत्री '
1 min
380
व्हावी मैत्री कधीही कुणाशी
सूर जुळावे अलवार कशाशी
कधी असावे ते मित्राशी
तर ते कधी , मुक्या प्राण्याशी
मैत्री असावी निरपेक्ष मित्राशी
मैत्री सावध असावी शत्रूशी
मित्रामधल्या निरलस प्रेमाशी
शत्रुमधल्या लपल्या गुणांशी
मैत्री अपुल्याही असावी मनाशी
आणि करावी घट्ट विचारांशी
मैत्रीत असावी गंमत ती खाशी
द्यावी भरभरून एक दुसऱ्याशी
मोजमाप न करावे मैत्रीशी
जोड असावी तिची हृदयाशी
झाली ना भेट रोज तिच्याशी
मैत्री असावी चिरंतन अविनाशी
