STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Others

3  

ANJALI Bhalshankar

Others

नाती.

नाती.

1 min
271

वेदनांचा ओलावा खोल रूजवलाय

भावनाशून्य करून आयुष्य कधीचं ठेवलेय फडताळात

अश्रूही त्या वळणावर सोडून आलेय

जिथं दुःखाने परीसीमा ओंलाडली .

तरीही भरून येत मन

जेव्ह विखुरलेली नाती फुलपाखरांप्रमान 

निर्जन माळरानावरील ओसाड झुडुपावर

भीरभीरावी तशी फुलवितात

नवी पालवी हरविलेल हसु घेऊन येतात सोबत.

वेदनांचा निचरा करुन

नव्यान सुखाच्या संवेदना जागवितात

प्रेमाची बरसात करून

नव्या पालवया फुलवितात

राग रूसवे हट्ट आणि लुटुपुटुच्या शिकायती साचलेल,

कधी रूसलेल सारच॔ हककान गुणगुणतात

आकाशातलया सहस्र धारांनी

सृष्टीच्या तप्त काळजात शिराव

अगदी तोच अनुभव देतात.

जातांना प्रेमाची हिरवळ ह्रदयात खोलवर पेरतात.

मग वेदना कुठे ऊरतात. 


Rate this content
Log in